Vedrishi

Free Shipping Above ₹1500 On All Books | Minimum ₹500 Off On Shopping Above ₹10,000 | Minimum ₹2500 Off On Shopping Above ₹25,000 |
Free Shipping Above ₹1500 On All Books | Minimum ₹500 Off On Shopping Above ₹10,000 | Minimum ₹2500 Off On Shopping Above ₹25,000 |

हिन्दू संघटन

Hindu Sanghatan

30.00

Subject : Hindu Sanghatan
Edition : 2021
Publishing Year : 2021
SKU # : 37500-CS00-SH
ISBN : 9788195474028
Packing : Paperback
Pages : 87
Dimensions : 14X22X2
Weight : 112
Binding : Paperback
Share the book

आर्य समाजला जुळण्यापूर्वी मी एक सर्व साधारण बालक होतो. ज्याच्या डोक्यात राष्ट्रप्रेम व मनात हिंदुत्व होतं. शालेय पुस्तकं वगळता इतर पुस्तकांसोबत माझा काही विशेष सबंध नव्हता. पण माझ्या शोधक वृत्तीमुळे आणि धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा एक छंद जोपासतांना मला ‘सत्यार्थ प्रकाश’ हा ग्रंथ लाभला. कदाचित हे पहिले पुस्तक आहे जे मी माझ्या शालेय पुस्तकांच्या व्यतिरिक्त वाचले. मग काय, पुस्तक वाचणे, पुस्तक संग्रहित करणे आणि ज्ञान अर्जन करणे हा एक नवा छंद उदयास आला.

माझा हा नवा छंद जोपासत असतांना स्वामी श्रद्धानंद यांचे ‘हिंदू संगठन; क्यो और कैसे?’ हे हिंदी पुस्तक मला प्राप्त झाले. पण महाविद्यालयीन दैनंदिन कार्यामुळे माझा हा छंद मागे पडला ज्याची खंत मला रोज वाटत होती. त्यानंतर कोरोनाच्या बंदीकाळात मी माझे वाचन कार्य पुन्हा सुरू केले. जेव्हा मी हे पुस्तक वाचले तेव्हा आपला भारताचा एक संक्षिप्त इतिहास, मुस्लिम आणि ख्रिस्ती आक्रमणकर्त्यांनी हिंदूंवर केलेले अमानुष अत्याचार, सुपीक वर्ण-व्यवस्थेचं, नापीक जाती व्यवस्थेत झालेले परिवर्तन व त्यामुळे उत्पन्न झालेला जातीवाद असे अनेक विषय माझ्यासमोर आले जे आपल्या हिंदू धर्माच्या अधोगतीचे कारण सिद्ध झाले. पण दुर्दैवाने ही कारणे बहुतांश लोकांना माहीत नाहीत. जर हे पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे झाले तर यातील क्लिष्ट हिंदी भाषेमुळे मराठी भाषिक लोकं वैतागून गेले असते. तेव्हा आर्ष साहित्य प्रचार ट्रस्ट समोर हा विषय मांडला व त्यांनी या पुस्तकाचा मराठीत अनुवाद करून प्रचार करण्याची अनुमती दिली. स्वामी श्रद्धानंद यांचे विचार मराठी भाषेत लोकांपर्यंत पोहोचतील अशी एक अपेक्षा आहे. .

या पुस्तकाचा अनुवाद करतांना मला भरपूर शब्दांमध्ये अडथळे आले व अनेक वाक्यांचे चुकीचे अर्थ निघाले तेव्हा दिल्लीचे डॉ. विवेक आर्य यांनी अतिउत्तम रित्या माझी मदत केली. सोबतच अतुलजी आचार्य आणि नारायण काका कुलकर्णी यांनी प्रूफरीडिंग करून या पुस्तकातील चुका दुरुस्त केल्या. लेखन जगात ज्यांचं बोट पकडून मी त्यांच्या अनुभवाने प्रत्येक पाऊलावर माझे मार्गदर्शन केले. माझे मनोबल जीर्ण होत असतांना माझ्या परिवाराने तसेच आमचे सहयोगी निवृत्ती शेडगे यांनी धीर देत माझे उत्साह वर्धन केले. या करिता मी या सर्व महानुभवांचा ऋणी आहे. तसेच या छोट्याशा धर्म यज्ञात आर्थिक रूपाने आहुती देणारे आचार्य अग्निदेव आर्य (गुरुकुल कालवा, हरियाणा), डॉ. रविंद्रजी निर्वाल (मेरठ) आणि प्रविणजी चिंचोळकर (बुलडाणा) यांचा मी सहृदय आभारी आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Hindu Sanghatan”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed

You're viewing: Hindu Sanghatan 30.00
Add to cart
Register

A link to set a new password will be sent to your email address.

Your personal data will be used to support your experience throughout this website, to manage access to your account, and for other purposes described in our privacy policy.

Lost Password

Lost your password? Please enter your username or email address. You will receive a link to create a new password via email.

Close
Close
Shopping cart
Close
Wishlist